इयत्ता 1 ली ते 8 वी · Windows 10 / 11

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे संपूर्ण काम — एकाच सॉफ्टवेअरमध्ये

गुण नोंद, वर्णनात्मक नोंदी, नोंदवही, प्रगतीपत्रके, निकालपत्रके, समग्र प्रगतिपत्रक (HPC) व संचयिका — काही क्लिकमध्ये, छापण्यासाठी तयार.

डेमो स्वरूपात मोफत वापरून पाहा · इंटरनेटशिवाय चालते · माहिती तुमच्याच संगणकावर
CCEवर्ग: 4 थी अ
डॅशबोर्ड
विद्यार्थी
गुण नोंद
वर्णनात्मक नोंदी
उपस्थिती
अहवाल

गुण नोंद · गणित · प्रथम सत्र

क्र.विद्यार्थ्याचे नावआकारिकसंकलितश्रेणी
1विद्यार्थी अ6629अ-1
2विद्यार्थी ब6127अ-2
3विद्यार्थी क5825ब-1
4विद्यार्थी ड6428अ-2
वर्गाची प्रगती: 72% नोंदी पूर्ण
45+तयार अहवाल व तक्ते
1 ली – 8 वीसर्व इयत्ता, सर्व तुकड्या
3 माध्यमेमराठी · सेमी इंग्रजी · English
3 संगणकएका खरेदीत (शाळा · घर · आणखी एक)
वैशिष्ट्ये

शिक्षकांचा वेळ वाचवणारे सॉफ्टवेअर

जुन्या CCE सॉफ्टवेअरचे सर्व काम आणि त्याहून अधिक — नव्या, वेगवान व सोप्या रूपात.

सोपी गुण नोंद

आकारिक व संकलित गुण तक्त्यात भरा; एकूण, टक्केवारी व श्रेणी आपोआप. एखादे साधन विद्यार्थ्यासाठी लागू नसल्यास ते आपोआप वगळले जाते.

वर्णनात्मक नोंदी बँक

प्रत्येक इयत्ता व विषयासाठी तयार नोंदी — मराठी, सेमी व English माध्यमासाठी. ✓ करून अनेक नोंदी एकत्र, मुलींसाठी आपोआप स्त्रीलिंगी रूप, "आपोआप भरा".

छापण्यासाठी तयार अहवाल

नोंदवही, प्रगतीपत्रके, निकालपत्रके, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे — पूर्वावलोकन, PDF व थेट छपाई; रंगीत किंवा कृष्णधवल.

समग्र प्रगतिपत्रक (HPC)

इयत्ता 1 ली व 2 री साठी पायाभूत स्तराचे संपूर्ण समग्र प्रगतिपत्रक — क्षमता, स्तर व अभिप्रायांसह.

विद्यार्थी संचयिका

रंगीत मुखपृष्ठासह प्रत्येक विद्यार्थ्याची संचयिका, शासकीय योजना, वर्तनविषयक मूल्यमापन व प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र.

जुन्या CCE मधून माहिती

जुन्या सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये. CCE_be.accdb कुठे आहे माहीत नसेल तर सॉफ्टवेअर ती स्वतः शोधते.

शाळा ↔ घर पेन ड्राइव्ह नवीन

सर्व माहिती एका फाइलमध्ये पेन ड्राइव्हवर घ्या व घरी आणा. जुनी फाइल नव्या माहितीवर चढू देत नाही; दोन्हीकडे काम झाल्यास एकत्र करते.

सुरक्षित माहिती व बॅकअप

डेटाबेस एन्क्रिप्ट केलेला; बदल झाल्यावर आपोआप बॅकअप, दिवसवार व महिनावार जपून ठेवलेले. हवे असल्यास पासवर्ड.

Excel आयात / निर्यात

विद्यार्थी व गुण Excel मध्ये भरून परत आणा — तपासणीसह, चुका आधीच दाखवून. याद्या व तक्ते Excel मध्ये निर्यात.

अहवाल

45 हून अधिक तयार अहवाल

प्रत्येक अहवाल पूर्वावलोकनात पाहा, PDF जतन करा किंवा थेट छापा. शाळेचे नाव, UDISE, पान क्रमांक तळटीपेत आपोआप.

नोंदवही व प्रगतीपत्रके

नोंदवही (A4 उभे / आडवे)प्रगतीपत्रक (A4 दुहेरी छपाई)प्रगतीपत्रक — नवा नमुनाप्रगतीपुस्तकप्रथम सत्र प्रगती पत्रक

निकालपत्रके

निकालपत्रक (सविस्तर)अ-ब-श्रेणीगुण-श्रेणीदोन्ही सत्रे एकत्रशाळा निकाल सारांश

वार्षिक निकाल

वार्षिक निकालपत्रक (मुखपृष्ठासह)एकत्रितगुण-श्रेणीगुणानुक्रमे यादी5 वी व 8 वी वार्षिक परीक्षा प्रगती पत्रक

श्रेणी तक्ते व सांख्यिकी

वर्ग श्रेणी तक्ताजातनिहाय श्रेणी तक्ताविषयवार / जातवार गोषवारापट संख्याविषयनिहाय संकलन

समग्र प्रगतिपत्रक व संचयिका

HPC (इ. 1–2)संचयिका मुखपृष्ठविद्यार्थी संचयिकाप्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र

उपयुक्त तक्ते, प्रमाणपत्रे व ओळखपत्रे

विषयनिहाय गुण तक्ताउपस्थिती पत्रकमासिक हजेरी पत्रकविद्यार्थी याद्याबोनाफाईडओळखपत्रे (स्टुडंट आयडी / PEN)शिक्षक नोंदी
सुरुवात

तीन पायऱ्यांत सुरू करा

इन्स्टॉलेशनला Admin पासवर्ड लागत नाही. नवीन आवृत्ती आल्यावर सॉफ्टवेअर स्वतः सांगते — एका क्लिकमध्ये अपडेट, माहिती सुरक्षित.

डाउनलोड व इन्स्टॉल

"मोफत डाउनलोड करा" दाबा व फाइल उघडा. निळी "Windows protected your PC" विंडो आल्यास More info → Run anyway.

शाळेची माहिती आणा

जुन्या CCE ची माहिती (CCE_be.accdb) आणा, बॅकअप उघडा किंवा नवीन सुरुवात करा — शाळेचा UDISE भरा.

सक्रिय करा

डेमोमध्ये सर्व काही वापरून पाहता येते (अहवालांवर "DEMO" शिक्का). खरेदीनंतर सॉफ्टवेअरमधूनच कोड मिळवा.

सक्रियता व आवश्यकता

एक खरेदी — तीन संगणक

सक्रियता

  • एका खरेदीत शाळेचे 3 संगणक (उदा. शाळा, घर व आणखी एक); आणखी लागल्यास +2 संगणकांचा पॅक.
  • वार्षिक किंवा आजीवन सक्रियता.
  • Windows पुन्हा इन्स्टॉल केल्यास त्याच संगणकाला तोच कोड परत मिळतो.
  • जुन्या CCE (Access) चे वैध कोड बदलीच्या काळात चालतात.

दुकानात किंमत पाहा व खरेदी करा

संगणकाची आवश्यकता

  • Windows 10 किंवा 11 (32 / 64-bit).
  • अहवाल पाहण्यासाठी Microsoft Edge WebView2 — Windows 10/11 मध्ये सहसा असतो.
  • जुन्या CCE ची माहिती आणण्यासाठीच: Microsoft Access Database Engine (MS Office असल्यास सहसा असते; नसल्यास मोफत).
  • इंटरनेट फक्त सक्रियता व अपडेटसाठी; रोजचे काम इंटरनेटशिवाय.
गोपनीयता

विद्यार्थ्यांची माहिती शाळेकडेच

नावे, गुण, नोंदी, फोटो — सर्व माहिती फक्त शाळेच्या संगणकावर, एन्क्रिप्ट केलेल्या डेटाबेसमध्ये. ती आम्हाला किंवा इंटरनेटवर कुठेही पाठवली जात नाही. जाहिराती किंवा मागोवा (tracking) नाही.

संपूर्ण गोपनीयता धोरण वाचा →

इंटरनेटवर फक्त हे जाते

  • नवीन आवृत्ती तपासताना: सध्याचा आवृत्ती क्रमांक.
  • सक्रिय करताना: UDISE, शाळेचे नाव, वर्ष, WhatsApp क्रमांक व संगणक ओळख क्रमांक.
  • विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती — कधीच नाही.
नेहमीचे प्रश्न

प्रश्न व उत्तरे

जुन्या CCE ची माहिती नव्या सॉफ्टवेअरमध्ये येईल का?

हो. विद्यार्थी, गुण, नोंदी, उपस्थिती व शाळेची माहिती — सर्व येते. CCE_be.accdb कुठे आहे माहीत नसेल तर "CCE_be.accdb कुठे आहे माहीत नाही? शोधा" बटण वापरा.

शाळेत व घरी दोन्हीकडे काम करता येईल का?

हो. दोन्ही संगणकांवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा (एका खरेदीत 3 संगणक) आणि "पेन ड्राइव्ह" बटणाने माहिती घ्या / आणा.

संगणक फॉरमॅट झाला तर माहिती जाईल का?

"संपूर्ण बॅकअप (फोटोसह)" पेन ड्राइव्ह किंवा Google Drive वर ठेवा. नव्या संगणकावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून तो बॅकअप उघडा — सर्व माहिती परत.

सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केल्यास माहितीचे काय?

माहिती चुकून जाऊ नये म्हणून ती Documents\CCE मध्ये तशीच राहते. पुन्हा इन्स्टॉल केल्यावर ती परत दिसते.

इंग्रजीत वापरता येईल का?

हो. सॉफ्टवेअर मराठी व English दोन्ही भाषांत चालते; नोंदी व अहवाल वर्गाच्या माध्यमानुसार (मराठी / सेमी / English).